नेताजींचा जन्मदिवस राष्ट्रीय सुट्टी घोषित करा – ममता बॅनर्जी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती (Netaji SubhashChandra Bose 125 Birth Anniversary) आहे. त्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमिवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.

देशनायक दिवस योग्य पद्धतीने साजरा करण्यात यावा आणि राष्ट्रीय नेत्याला आदराजंली वाहण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावा, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) केली आहे.

दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच येत्या २३ जानेवारीला नेताजींच्या जंयतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे मोदींनी सांगितले. pm modi announced Netaji Subhas Chandra Bose grand statue will installed at india gate

इंडिया गेटवर बसवणार नेताजींचा पुतळा –

दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. देश नेताजींची १२५ जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्त हा पुतळा बसविण्यात येणार असून तोपर्यंत इथं होलोग्राम पुतळा ठेवण्यात येणार आहे. नेताजींचा ग्रॅनाईटचा पुतळा 28 फूट उंच आणि सहा फूट रुंद असेल आणि 1968 मध्ये हटवण्यात आलेला किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा असलेल्या मंडपात त्याची स्थापना केली जाईल. आज पंतप्रधान या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण करतील, असंही त्यांनी सांगितलं होतं. अमर जवान ज्योतीच्या विलनीकरणावरून विरोधकांनी सरकारव खूप टीका केली. या प्रकरणावरून राजकारण तापलं असताना पंतप्रधान मोदींनी नेताजींचा पुतळा बसवण्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *