Horoscope Today दि. ८ फेब्रुवारी २०२६ ; आज पैज जिंकता येईल……….. ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ८ फेब्रुवारी २०२६ | 

मेष राशिभविष्य (Aries Horoscope )
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. बदलाला अनुसरून वागावे.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. उगाच विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल. कामाचे योग्य नियोजन करावे.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
क्षुल्लक मतभेद मनात धरून ठेवू नका. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
मनाची विशालता दाखवाल. मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखाल. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका. प्रेमसौख्याला बहर येईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
नोकरांचे सुख चांगले राहील. दिवस काहीसा आळसात जाईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
कलेसाठी वेळ काढता येईल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
कौटुंबिक काळजी लागून राहील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. उष्णतेचे विकार जाणवतील.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
सामाजिक वादात अडकू नका. धार्मिक कामात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
कफाचा त्रास जाणवेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
सर्वांशी लाघवीपणे बोलाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *