कोरोना पासून दूर रहाण्यासाठी : प्रतिकारशक्ती वाढावा

Spread the love

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस ‘कोविड १९’बद्दल आपण सर्व ती काळजी घेत आहोत. उदा. वारंवार हात धुणे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, कोणत्याही व्यक्तीशी हस्तांदोलन न करणे, बोलताना कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवणे. त्याचबरोबर बंद मुळे आपल्याला घरातूनच आपली दैनंदिन कामे करावी लागत आहेत. अशा सर्व परिस्थितीत एक भाग प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे, आपण आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकल्यास कोरोनाच काय कोणत्याही व्याधीला, आहारावर योगाभ्यासाच्या सहाय्याने आपण मानसिक संतुलन व शारीरिक क्षमता वाढवूयात. लहान मुले, तरुण वर्ग, वृद्ध यांनी घरच्या घरी वय, प्रकृतीप्रमाणे सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार,  योगासने व ध्यान आदींचा सराव करावा.

‘प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय’

मुलांसाठी…
लहान मुलांनी शाळेला सुटी मिळाल्याने साधारणत: तासभर घरात व्यायाम, योगाभ्यास नक्कीच करावा. त्यामुळे, दिवसभर तुम्ही उत्साही, तरतरीत राहू शकाल. प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होईल. मुलांनी घरातच जॉगिंग, दोरीवरच्या उड्या, जोरबैठका यासारखा व्यायाम करावा.घरामध्येच दररोज १२ सूर्यनमस्कार घालावेत.
तरुणांसाठी…
तरुण वर्ग, नोकरदारांनी दररोज निदान अर्धा तास योगाभ्यासासाठी काढावा. नियमित ओंकार म्हणावेत.कपालभाती शुद्धिक्रिया करावी. जलनेती, सूत्रनेती येत असल्यास तिचा अभ्यास करावा.दररोज नियमित १२ सूर्यनमस्कार घालावेत.
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविणारी व मानसिक ताण कमी करणारी काही आसने करावीत. स्वत:ला सकारात्मक सूचना देऊन ध्यान करावे. ‘आम्ही सर्वजण निरोगी, आनंदी आहोत,’ अशी भावना प्रस्थापित करून ध्यान करावे.
ज्येष्ठांसाठी…ज्येष्ठ व्यक्तींनी घरातच चालावे. शक्य आहे त्यांनीच स्वत:च्या प्रकृतीला मानवेल इतपत सूक्ष्म व्यायामप्रकार, प्राणायाम, ध्यान, सोपी आसने करावीत. आहारावर विशेष लक्ष द्यावे.नेहमी सकारात्मक विचार करा. ध्यान करतानाही सकारात्मकच भावना मनात ठेवा.

टिप : काही जुने आजार, शस्त्रक्रिया झाली असल्यास योगतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *