विषय गंभीर मात्र पुणेकर खंबीर ; जनता कर्फ्यूला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद

Spread the love

महाराष्ट्र 24-ऑनलाईन- पुणे ; कोरोना व्हायरसने जगभर थैमान माजवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला पुणे, पिंपरी चिंचवडसह संबंध  महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसादात मिळत आहे… पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील रस्त्यांवर सकाळपासूनच शुकशुकाट पहायला मिळत आहे… 

केंद्रासह महाराष्ट्र सरकारनेने केलेल्या आवाहनाला जनतेने  गांभीर्याने घेतले असल्याचे पहायला मिळत आहे… परिणामी पिंपरी-चिंचवड, पुणे मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कराड येथील जनतेकडून कर्फ्यूला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे… पुणेकरांच्या बाबतीत सांगायचे झाले तर जेव्हा जेव्हा विषय गंभीर असतो तेव्हा तेव्हा पुणेकर स्वेच्छेने संकटाला सामोरे जात खंबीर असल्याचे त्यांच्या कृत्यातून जगाला दाखवून देता असतात… हेच आजच्या जनता कर्फ्युने दाखवून दिले आहे… पाहू या आज 22 मार्च रोजी दिवसभरातील कडकडीत बंदची काही क्षणचित्रे खास महाराष्ट्र 24 च्या वाचकांसाठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *