कढीपत्त्याची पानाची आहेत अनेक आरोग्यदायी फायदे ; दररोज करा सेवन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ जानेवारी । इडली, सांबार, उपमा, नारळाची चटणी, विविध प्रकारच्या भाज्या, आमट्या, कढी यांना खमंग फोडणी देण्यासाठी कढीपत्त्याची पाने वापरली जातात. कढीपत्ता जेवणाला चविष्ट बनवण्यासोबतच आरोग्य सुधारण्यासाठीही गुणकारी आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी आणि जीवनसत्त्वे यांसारखी पोषक तत्त्वे डोळे निरोगी ठेवण्यास, पचनसंस्था सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास सक्षम आहेत, याशिवाय अनेक आरोग्यदायी फायदे कढीपत्ता दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतात.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करा. ज्यांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास आहे, अशांकरिता हा उपाय गुणकारी आहे. याकरिता लिंबाच्या आणि कढीपत्त्याच्या रसात चिमूटभर साखर घालून खा. उलटी, मळमळ, जीव घाबरणे या त्रासांवरही हे औषध फायदेशीर आहे.

कढीपत्ता खाल्ल्याने यकृताचे आरोग्य सुधारून ते कार्यक्षम बनण्यास मदत होते. यासाठी दररोज उपाशीपोटी कढीपत्त्याची पाने खावीत. एवढेच नाही तर कढीपत्त्यामुळे सिरोसिसचा धोका कमी होऊन यकृत मजबूत आणि निरोगी बनते.

उपाशीपोटी कढीपत्ता खाल्ल्याने पोटदुखी थांबते. बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचन यासारखे आजारही दूर होतात. पचनक्रियेशी संबंधित आजार टाळण्यासाठी दही किंवा ताकात कढीपत्ता घालून त्याचे सेवन करावे.

लठ्ठपणा किंवा वाढत्या वजनावाढीला कंटाळला असाल तर कढीपत्ता हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी दररोज सकाळी तुळशीसोबत कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ए असते. यामुळे दररोज सकाळी उपाशीपोटी कढीपत्त्याची पाने चघळावीत. डोळ्यांची दृष्टी आणि आरोग्य सुधारते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *