एटीएम कार्डवरील 16 अंकांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 88 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । जगभरात क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतही याला अपवाद नाही. भारतातील करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. एटीएम कार्ड आल्याने बँकिंग करणे खूप सोपे झाले आहे. कारण यामुळे लोकांचा वेळ वाचला आहे. शिवाय ते कोणत्याही वेळी त्यांच्या बँकेतून पैसे काढू शकतात. आजकाल ऑनलाइन पेमेंटसाठीही एटीएम कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

परंतु जेव्हाही तुम्ही तुमच्या डेबिट कार्डने ऑनलाइन पेमेंट करता, त्यावेळी तेथे तुम्हाला तुमचा 16-अंकी एटीएम अंक टाकायला सांगितले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का की? एटीएम कार्डवरील 16 अंकांचा अर्थ काय आहे? आणि तो कशाच्या आधारावर दिला जातो?

आज आम्ही तुमहाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या गोष्टीबद्दल बेसिक माहिती तुम्हाला असेल

पहिला अंक
एटीएम कार्डवरील पहिला अंक हे कार्ड कोणी जारी केले आहे हे सूचित करतो. या क्रमांकाला मेजर इंडस्ट्री आइडेंटिफायर म्हणून देखील ओळखले जाते. हे आकडे वेगवेगळ्या उद्योगांसाठी वेगवेगळे असतात.

पुढील 5 अंक
पहिल्या अंकानंतरचे पुढील 5 अंक हे जारी करणाऱ्या कंपनीला सूचित करतात. याला इश्यू आयडेंटिफिकेशन नंबर असे म्हणतात.

उदा. मास्टरकार्ड- 51XXXX-55XXXX, व्हिसा- 4XXXXXXX

पुढील 9 अंक
पुढील 9 अंक बँक खाते क्रमांकाशी जोडलेले आहेत. मात्र, हा क्रमांक तुमचा बँक खाते क्रमांक नसून त्याच्याशी जोडलेला एक नंबर असतो. त्याच वेळी, कार्डमध्ये नमूद केलेला शेवटचा क्रमांक हा चेक अंक म्हणून ओळखला जातो. हा अंक कार्डची वैधता दर्शवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *