ही लक्षणे दर्शवितात तुमची रोगप्रतिकारक्षमता कमी झाली आहे का

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । कोरोना, ओमिकॉन या संसर्गजन्य आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाची धडपड रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल, यासाठी होताना दिसते. प्रत्येक जण प्रतिकारशक्तीबद्दल चिंतेत आहेत, मात्र आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे की कमकुवत आहे, हे कसे शोधायचे? शरीरातील काही लक्षणांवरून हे समजू शकते. तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे हे कसे ओळखाल ? वाचा…

थकवा येणे
ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते त्यांना लवकर थकवा जाणवतो. रात्रीच्या वेळी त्यांची 7 ते 8 तास झोप झाली असली तरीही अशा व्यक्तिंना सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. उत्साह जाणवत नाही. तुम्हाला थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे रोगप्रतिकारक्षमता कमी असण्याचं लक्षण आहे.

सतत सर्दी-खोकला होणे
प्रत्येक ऋतुत सर्दी-खोकला होणे आणि तो बराच काळ राहिल्यामुळे तुम्ही त्रस्त झाला असाल, तर तुमची रोगप्रतिकारक्षमता कमी झालेली असू शकते. मोठ्या व्यक्तिंना वर्षातून दोन ते तीन वेळा सर्दी, खोकला होणं हे सर्वसाधारण आहे, पण सर्दी होण्याचं प्रमाण जास्त असणं हे रोगप्रतिकारशक्तीचा अभाव असल्यामुळे असू शकतं.

पोट बिघडणे
आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशींचे प्रमाण 70 टक्के असते. या पेशी आतड्यात असतात त्यामुळे ज्यांचे आतडे कमकुवत आहेत आणि पोट बिघण्याचे प्रमाण जास्त असेल त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते.

जखम लवकर भरून न निघणे
मधुमेह असलेल्यांना जखम भरून यायला वेळ लागतो. काही जणांच्या बाबतीत मात्र मधुमेह नसतानाही जखमा बऱ्या होत नसतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या रोगप्रतिकारशक्तीबाबत सल्ला घ्यावा.

ताणतणाव
दीर्घकाळ तणावग्रस्त स्थितीत राहिल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, कारण तणतणावामुळे शरीरातील लिम्फोसाइट्स, पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात. या घटकांमुळे संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी होते. शरीरातील लिम्फोसाइट पातळी जितकी कमी तितकी विषाणूशी लढण्याची क्षमता कमी होते.

रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी काय कराल ?
दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करण्याची गरज आहे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.
– संतुलित आहार घ्या.
– पुरेशी झोप घेण्याची आवश्यकता आहे.
– नियमित व्यायाम करा.
– हात स्वच्छ धुवा.
– लसीकरण करून घ्या.
– वजन नियंत्रणात ठेवा.
– व्यसन करू नका.
– ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *