महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी । पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्यावतीने सुरू असलेल्या मिळकतकर वसुलीच्या (Property Tax Recovery) अभय योजनेला (Abhy Yojana) २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या (Standing Committee) बैठकीत घेण्यात आला. या योजनेची मुदत २६ जानेवारी रोजी संपत होती. तसेच निवासी मिळकतींबरोबर मोकळ्या जागांसाठीही ही योजना लागू करण्यात आली आहे, असे माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
मिळकतकराची मोठी थकबाकी असलेल्या मिळकतदारांसाठी महापालिकेकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेची मुदत २६ जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. परंतु स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाने पंधरा दिवसांचा कालावधी लावला. त्यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रासने म्हणाले. तर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि चौशिंगा खंदक उभारण्यासाठी एक कोटी १३ लाख रुपये आणि चौशिंगा खंदकासाठी सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. दोन्ही खंदक केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या निकषांनुसार उभारण्यात येणार आहेत, असे सांगून रासने म्हणाले, ‘‘महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील मध्यवर्ती ऑक्सिजन कार्यप्रणालीसाठी लिक्विड ऑक्सिजन खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.