Lasith Malinga : श्रीलंका संघात पुनरागन; मिळाली ही मोठी जबाबदारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी ।श्रीलंकेचा जलतगती गोलंदाज लसिथ मलिंगा ( Lasith Malinga ) यांची पुन्हा एकदा श्रीलंकेच्या संघात ( Sri Lankan Cricket Team ) पुनरागमन झाले आहे. पुन्हा एकदा श्रीलंकेच्या संघासोबत आपणास लसिथ मलिंगा पुन्हा एकदा दिसणार आहे. यावेळी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ( Sri Lanka Cricket Board ) त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता ही मोठी जबाबदारी मलिंगा कशी पार पाडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीलंकेचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया ( Sri Lanka Tour Of Australia 2022 ) दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यासाठी श्रीलंका संघाचा विशेष गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लसिथ मलिंगा ( Lasith Malinga ) यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे लसिथ मलिंगा आपल्याला गोलंदाजी प्रशिक्षक ही नवी जबाबदारी पार पडताना दिसेल. त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोठा अनुभव आहे. तो श्रीलंकेच्या गोलंदाजांना लसिथ मलिंगा यांचा नक्की फायदा होणार आहे.

लसिथ मलिंगा ( Lasith Malinga ) याची निवड करण्यात आल्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, आम्ही लसिथ मलिंगावर नवी व मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याला अगदी थोड्या कालावधीसाठी आम्ही विशेष गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे. तो श्रीलंकेच्या गोलंदाजांची मदत करेल तसेच खेळाच्या योजनांची तयारी करण्यासाठी सुद्धा तो योगदान देईल.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यावेळी मलिंगाचे ( Lasith Malinga ) कौतुक करत आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. खास करुन टी २० मालिकासाठी त्याची सर्वाधिक मदत संघाला होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *