महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी ।छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एका वक्तव्यावरुन सध्या मोठा वाद रंगला आहे. श्वेता तिवारीने अंतर्वस्त्रासंबंधी बोलताना देवाचा उल्लेख केल्याने हा वाद सुरु झाला आहे. दरम्यान याप्रकरणी श्वेता तिवारीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
श्वेता तिवारीने आपली आगामी बेव सीरिज ‘शो स्टॉपर’च्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये आली होती. या वेब सीरिजमध्ये रोहित रॉय, सौरभ जैनदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. आपल्या सहकलाकारांसोबत मंचावर उपस्थित असताना श्वेता तिवारीने हे वक्तव्य केलं. “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”, असं तिने म्हटलं आणि तेथून वादाला सुरुवात झाली.