पीएम मोदी आज देशातील जनतेवर कडाडले ! कठोर शब्दात केलं ट्वीट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; नवी दिल्ली ;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या देशातील जनेतेचे भरभरून कौतुक केले होते. तथापि काल सायंकाळी देशातील बऱ्याच भागात लोक नियम तोडून रस्त्यावर आल्याने चांगलेच नाराज झाले आहेत. पीएम मोदी यांन ट्विट करून आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की, बरेच लोक अद्यापही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. कृपा करून स्वत: ला वाचवा, आपल्या कुटुंबास वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. राज्य सरकारांनी विनंत्या व कायदे पाळावेत अशी मी विनंती करतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील २५ राज्यातील ७५ कोरोराग्रस्त जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्यासंबंधीचे आदेश संबंधित राज्यांना दिले आहेत. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, पूणे, रायगड, अहमदनगर, रत्नागिरी, यवतमाळ या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
देशभरातील सर्व मेट्रो सेवा ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासोबतच दिल्ली, लखनऊ, नोएडा, कोलकाता, कोची, बंगळूर मेट्रोला बंद करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *