महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; पुणे ; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात एका रात्रीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल १५ ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ च्या घरात गेला आहे. गेल्या २४ तासात आढळलेल्या केसेसमध्ये एकट्या मुंबईमधील १४ रुग्ण आढळले. दरम्यान, एक रुग्ण पुण्यामध्ये आढळला.
पॉझिटिव्ह झालेल्यांमध्ये आठ जणांना संपर्कात येऊन कोरोनाची लागण झाली आहे. चार जणांनी प्रभावित देशांमधून प्रवास केला आहे. तथापि उर्वरीत रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे राज्यात बाधितांचा आकडा ८९च्या घरात गेला आहे.