आयुर्वेदानुसार जेवणाची योग्य पद्धत; तुम्ही देखील जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे. आजारांपासून दूर रहायचे असेल तर आपल्या शरीराच्या प्रकृतीबाबत तज्ज्ञांशी चर्चा करूनच आपला आहार चार्ट तयार करावा. जेवन करताना किंवा अन्न शिजवताना सामान्यपणे काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

भाज्या (Vegetables) शिजवताना त्या फारही जास्त शिजणार नाहीत, अथवा फारही कच्च्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुम्ही एखादा गोड पदार्थ (Sweets) बनवत असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी (SUGER)मध किंवा गुळ टाका. साखरेचा शक्य तितका कमी वापर करावा. खाण्यात मैद्याच्या पिठाचा वापर न करता गव्हाचे पिठ वापरावे.

आल्याचा छोटा तुकडा तव्यावर गरम करून त्यात काळे मीठ टाका. हा तुकडा जेवण करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि भूकही चांगली लागते. तसेच जेवताना अन्न नेहमी चांगले चावूनच खावे.

आयुर्वेदात असे सांगितले आहे की अन्न नेहमी भुकेच्या अर्ध्या प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून ते चांगले पचते. याशिवाय अन्न नेहमी ताजे खावे आणि चांगले चावून खावे. जेवताना बोलू नका.

जेवणादरम्यान पाणी पिऊ नये, पण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. असे करणे शरीरासाठी फायदेशीर असते. पाणी पिताना अगदीच गरम, किंवा खूप थंड फ्रीजमधले पाणी पिऊ नका. तसे केल्यास शरीरामधील तापमाण कमी होते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिताना ते नेहमी सामान्य तापमान असलेलेच प्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *