महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । पिंपरी-चिंचवड । गणेश क्षिरसागर ।
# विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य संपादित केलेल्या नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
# भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणार नाभिक समाजातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान
महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा संचलित नाभिक समाजातील इ.१० वी व इ १२ वी.मार्च २०२१ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. या दरम्यान, देशाला अमृतमहोत्सव वर्षपूर्ती निमित्त नाभिक समाजातील आजी-माजी स्वातंत्र्य सैनिकांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.
नाभिक समाजातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती https://wa.me/+919850858896 या मोबाईल क्रमांकावर दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावे. या दरम्यान, इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच समाजातील कला, क्रीडा, संगीत, साहित्य, आध्यात्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणी विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव समारंभ पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, पालकांचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, व्हाट्स अप नंबर, पालकांचा व्यवसाय व राहण्याचा पत्ता इत्यादी माहिती पाठवावी.
गुणी विद्यार्थ्यांची पात्रता
विद्यार्थी २०२०-२०२१ मध्ये शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेले असावे. फेब्रु/ मार्च २०२१ मध्ये परिक्षार्थी असून, जून २१ मध्ये उत्तीर्ण झालेला असावा. सदर कार्यक्रमामध्ये इ.१० वी. व इ.१२ वी शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनमधून सर्वांत जास्त गुण असणार्या विद्यार्थ्यांला प. पू. सदगुरु माऊलीनाथ महाराज वाळूंजकर यांच्या नावाने रु. ५०००/- रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. नाभिक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली माहिती वरील क्रमांकावर व्हाट्स अप करण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे, तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ समीतीच्यावतीने करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थी तसेच आजी-माजी सैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
पुणे जिल्हा नाभिक महामंडळाच्या म.अध्यक्षा सौ.अनिता मगर, पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेशजी राऊत, गुंणवत विद्यार्थी सत्कार सोहळा समिती अध्यक्ष प्रभाकर भालेकर, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समिती उपाध्यक्ष अरुण ढमाले, प्राचार्य प्रदिप कदम, तानाजी वाळुंजकर, प्रा. विक्रमादित्य मालतुमकर, मा. सरपंच संतोष रसाळ, भाऊसाहेब यादव, सुनिल वाळुंज, मगेंशजी पांडे, कांताराम आढाव, राजेंद्र ढमाले, हेमंत भालेकर, दत्तात्रय वाळुंजकर, आदिनाथ गायकवाड, नितीन सुरवसे, नितीन कुटे, गणेश राऊत, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड शहर गणेश वाळुंजकर, म.अध्यक्ष पिंपरी-चिंचवड कविता यादव, सौ. कविता वाळुंज, म.अध्यक्ष,खेड तालुका समन्वयक अशोक मगर, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समिती सदस्य दत्तात्रय गायकवाड सर आदी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी-पालकांना तसेच आजी-माजी सैनिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाभिक समाजातील इयत्ता 10 वी 12 वीमध्ये सर्वात जास्त गुण प्राप्त केलेल्या तसेच कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या गुणीजनांचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नाभिक समाजातील आजी-माजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्यावतीने सामाजिक कार्यक्रम राबवून नाभिक समाजातील विविध घटकांना योग्य न्याय देण्यात येतो. कामगार नेते प्रभाकर भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती सामाजिक कार्य करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीमध्ये सहभागी व्हावे.
-अशोक मगर
माजी अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर शाखा.
विद्यमान राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई.
समन्वयक, गुंणवत विद्यार्थी सत्कार सोहळा समिती सदस्य.