Maharashtra Weather Forecast : राज्यात थंडीचा कडाका वाढणार : आयएमडीचा 9 जिल्ह्यांना इशारा, गारासंह पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३१ जानेवारी । राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली,औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालंय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 वर आहे. त,र काही ठिकाणी हा 187 वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

पुणे वेधशाळेकडून राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, औरंगाबाद, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली, या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रविवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, कर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्रान व्यक्त केला आहे.

मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालंय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 वर आहे. तर काही ठिकाणी हा 187 वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *