Upcoming Movies : फेब्रुवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका; हे चित्रपट होणार रिलीज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । Upcoming Movies in FEB 2022 : जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता फेब्रुवारी महिन्यात काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची तसेच सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. जाणून घेऊयात कोणते चित्रपट या महिन्यात रिलीज होणार आहेत…

Loop Lapeta : दिग्दर्शक आकाश भाटिया यांचा लूप लपेटा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक जण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

Gehraiyaan : दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अन्नया पांडे अशी स्टार कास्ट असणारा Gehraiyaan हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम ओरिजनलवर प्रदर्शित होणार आहे.

Badhai Do : बधाई दो चित्रपट देखील या माहिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि भूमि पेडणेकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 11 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Gangubai Kathiyawadi : दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या बहुचर्चित चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भाट प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *