Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. तशी सगळ्याच थरातील लोकांना आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून आला आहे. यामुळे आगामी आर्थिक वर्षांतील (2022-2023) संभाव्य आव्हानांना केस सामोरे जाण्यावर नियोजन केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच अर्थव्यवस्था मजबूत कशी होईल यावर भर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर 8 ते 8.5 टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये उमटला. (Union Finance Minister Nirmala Sitharaman will present the Budget 2022 in the Lok Sabha today)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज सकाळी 11वाजता लोकसभेत त्या आपला अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेने पाच लाख कोटी डॉलरचा महत्त्वाकांक्षी टप्पा ओलांडायचा झाल्यास पायाभूत सेवा-सुविधांवर 1.4 लाख कोटी डॉलर खर्च करण्याची गरज असल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे या अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा मिळणार काय, याची उत्सुकता आहे.

सध्या महागाईचा कहर दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजी आणि घरगुती गॅसच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. सामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला हळहळू गती मिळत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी आणि सामान्यांच्या दृष्टीकोणातून महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *