महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ फेब्रुवारी । एमआयएमचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी ( Attack On Asaduddin Owaisi ) यांच्यावर उत्तर प्रदेशात गुरुवारी मोठा हल्ला झाला. त्यांच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
खासदार असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने ओवेसींची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे. केंद्र सरकारने ओवेसींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांना CRPF ची ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा आदेश तातडीने लागू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.