हे पदार्थ आहारात घ्या ; गॅसेसच्या त्रासापासून सुटका होईल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ फेब्रुवारी । मसालेदार आणि तेलकट पदार्थांच्या सेवनाने एसिडीटी आणि गॅसेसची समस्या उद्भवते. वाढत्या वयानुसार, पोटाशी संबंधित आजार बळावू लागतात. याचं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार पचनसंस्था पूर्वीपेक्षा कमजोर होऊ लागते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या आहारात या 4 पदार्थांचा समावेश केला तर अशा सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते.

आलं
सर्दी आणि खोकला झाल्यावर आलं खाण्याचा सल्ला दिला जातो. आल्यामध्ये इतर अँटीऑक्सिडंट असतात जे पोटाच्या समस्या दूर करतात. गरम पाण्यात आलं उकळून किंवा चहामध्ये आल्याचा वापर पोटासाठी फायदेशीर ठरतो.

संत्र
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे कधीही संत्र्याचा ज्यूस पिण्याऐवजी ते चाऊन खावं. यामध्ये असलेल्या laxative पोट साफ करण्यासाठी मदत करतं. तसंच संत्र्याचा रस प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

मोहरी
मोहरीच्या दाण्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळतं. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसंच आतड्याच्या हालचालींमुळे होणारे गॅस आणि पोटदुखी बरी होण्यास मदत होते.

लिंबू
लिंबामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक आढळतात. तसंच पोटाच्या समस्या दूर करणारे पेक्टिन फायबर देखील यामध्ये असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *