महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ फेब्रुवारी । गेल्या काही दिवसांपासून रोज्यातील कोरोना (Corona Cases In Maharashtra) रूग्णांची संख्या सातत्याने कमी होते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना निर्बंध वाढविण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा विचार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण झाल्याचे देखील यावेळी सांगितले. (Corona Restriction In Maharashtra)
टोपे म्हणाले की, राजातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, मुंबई-पुण्यातही रूग्णसंख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी, ती पुन्हा खाली येईल. त्यामुळे आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे. सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध (Corona Restriction In Maharashtra ) टप्प्या-टप्प्याने कमी येईल असंही टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल. कोव्हॅक्सिनचा (Covaxin Dose) राज्यात काही प्रमाणात तुटवडा आहे. तुटवडा पडू नये म्हणून केंद्राने काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण झालंय अशी माहितीही टोपे यांनी दिली. (Corona Vaccination In Maharashtra)