Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण ; जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) कालच्या तुलनेत आज मोठी घसरण दिसून आली. राजधानी मुंबईत आज (शुक्रवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण नोंदविली गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याची भावात घसरण दिसून येत आहे. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49,200 आणि 22 कॅरेट सोन्याला 45,100 रुपये भाव मिळाला. कोविड काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव जाणून घेऊया…

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळा)
मुंबई : 49200 रुपये (रु. 450 घसरण)
पुणे : 49060 रुपये (रु. 10 वाढ)
नागपूर : 49200 रुपये (रु. 450 घसरण)
नाशिक : 49050 रुपये (रु. 0 वाढ/घसरण)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळe):
मुंबई : 45100 रुपये (रु. 400 घसरण)
पुणे : 45050 रुपये(रु. 0 वाढ/घसरण)
नागपूर : 45100 रुपये(रु. 400 घसरण)
नाशिक : 45050 रुपये(रु. 0 वाढ)

सोन्याच्या किंमती घसरणार
HDFC सिक्युरिटीजचे समीक्षक तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने देशातील सोन्याच्या किंमतींवर त्यांचा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या (Gold Rate Fall) किंमती आणखी घसरु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *