महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । भाजप आमदार नितेश राणे यांना आजही दिलासा मिळाला नाही. नितेश राणे (nitesh rane) यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (police Custody) देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे हे जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. त्यामुळे सत्र न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.