Attack on Owaisi : असदुद्दीन ओवेसींनी Z श्रेणीची सुरक्षा नाकारली, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी हल्ला झाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने त्यांना तत्काळ प्रभावाने सीआरपीएफची Z श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ओवेसींनी ही Z श्रेणीची सुरक्षा नाकारली आहे.

“मला मृत्युची भीती वाटत नाही, मला Z श्रेणीची सुरक्षा नकोय, मी ती नाकरतो. मला ‘A’ श्रेणीचा नागरिक बनवा. मी गप्प बसणार नाही. कृपया न्याय करा…त्यांच्यावर(हल्लेखोर) यूएपीए नुसार आरोप लावा. द्वेष, कट्टरतावाद संपवण्याचे मी सरकारला आवाहन करतो.” असं ओवेसी यांनी आज संसदेत बोलून दाखवलं.

तर, हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. “१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”, असं ओवेसी म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *