7th Pay Commission Updates: केंद्र सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट ! 1 कोटींहून अधिक कर्मचा-यांना होणार फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । केंद्र सरकारने गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी कर्मचा-यांना महागाई भत्त्यात (DA) दणक्यात वाढ केली होती. त्यामुळे महागाईशी दोन हात करण्यासाठी कर्मचा-यांना बळ मिळाले होते. ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 31 टक्के करण्यात आला होता. नुकताच देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला. आता सरकार केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचा-यांना (Central Employees and Pensioners) मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. महागाईमुळे कर्मचा-यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कोरोना काळात सरकारने तीन वेळा महागाई भत्ता गोठोवला होता. या अन्यायाची भरपाई सरकार त्यांना करुन देणार आहे. सरकार महागाई भत्याची थकबाकी लवकरच कर्मचा-यांच्या खात्याच जमा करेल. रिपोर्ट्सनुसार, सरकार गेल्या 18 महिन्यांतील प्रलंबित डीएची थकबाकी एकाच वेळी देण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय झाल्यास येत्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकावेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम एकादाच मिळेल. एवढेच नाही तर यंदा महागाई भत्यात पुन्हा 3 टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महागाईमुळे कंबरडे मोडलेल्या केंद्रीय कर्मचा-यांना वेतनाच्या 34 टक्के महागाई भत्ता मिळेल.

सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 60 लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) चे सचिव (Staff Side) शिव गोपाल मिश्रा यांनी माहिती दिली की, परिषदेने डीएची थकबाकी एकाच वेळी देण्याची विनंती पुढे ढकलली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने मे 2020 ते जून 2021 पर्यंत डीए दरवाढ बंद केली होती.नंतर डीए आणि डी.आर. वाढ पूर्ववत करण्यात आली. पण जुनी थकबाकी देण्यात आली नाही.

रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो. साधारणत: वर्षातून दोनदा डीए वाढवला जातो. यावेळी जानेवारीतील डीए वाढ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डीए 17 टक्क्यांवरून 31 टक्के केला होता. जानेवारी 2022 साठी डीएमध्ये 3 टक्के वाढीची शक्यता आहे, त्यामुळे डीए 34 टक्क्यांपर्यंत वाढेल.

वाढत्या महागाईशी दोन हात करता यावे आणि कर्मचारी महागाईच्या चिंतेने त्रस्त राहू नयेत यासाठी केंद्र सरकार कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना महागाई भत्ता देते. त्यांना दरवाढीचा वर्षातून दोनदा लाभ दिल्या जातो. 18 महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय येत्या बैठकीत झाल्यास श्रेणीनुसार, काही कर्मचा-यांना 11 हजार 880 ते 37 हजार 554 रुपये तर काही कर्मचा-यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये महागाई भत्ता मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *