राज ठाकरे ब्रीच कँडीकडे रवाना ; लतादीदींची प्रकृती बिघडली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न 92 वर्षीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital Mumbai) जाऊन लतादीदींच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.

लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण, आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांनी लतादीदींच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांनी मीडियाशी बोलणं टाळलं. स्तब्ध होऊन राज ठाकरे हॉस्पिटलबाहेर उभे होते.

लतादीदी यांची तब्येत ठीक आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. दीदी व्हेंटिलेटरवर आहेत.. उपचार सुरू आहेत. चुकीच्या बातम्या चालवू नका, मी डॉक्टरांना सांगितलं खाली जाऊन मेडिकल अपडेट द्या. जेणेकरून लोकांच्या मनातील प्रश्नांना योग्य उत्तर मिळतील, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. आता त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती नाजूक आहे, पण त्या उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांच्या तब्येतीवर डॉक्टर नजर ठेवून आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतुत सदनानी यांनी दिली. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *