महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । आतापर्यंतच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर फुटबॉल विश्वातील अनेक विक्रम आहेत. त्यासोबतच त्याच्या नाववर सोशल मीडियाशी निगडीत ही काही विक्रम जोडले गेलेले आहेत. आता रोनाल्डो हा जगातील पहिला असा व्यक्ती बनला आहे की ज्याचे लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवरती ४०० मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
पोर्तुगीज स्टार रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच 37 वा वाढदिवस साजरा केला. त्याला जगभरातून शुभेच्छा दिल्याबद्दल त्याने त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. आभार मानताना असताना रोनाल्डो म्हणतो की, “आयुष्य हे एक रोलर कोस्टर रोईड सारखे आहे. कठोर परिश्रम, वेग, उद्दिष्टे, अपेक्षा… पण शेवटी, हे सर्व कुटुंब, प्रेम, प्रामाणिकपणा, मैत्री, मूल्ये या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. आपण वाढदिनी दिलेल्या सर्व संदेशांसाठी धन्यवाद.! ३७ वर्ष आणि तेथून पुढे…! असे त्याने त्याच्या सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे.