रिकाम्या पोटी ग्रीन टी पिताय? आरोग्यास हानिकारक ठरू शकते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । आजकाल ग्रीन टी (Green Tea) पिणे हे ट्रेंडपेक्षा कमी नाही. आरोग्य (Heath) आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या बहुतेक लोकांना ग्रीन टी खूप आवडतात. एका अहवालानुसार, कमीत कमी प्रमाणात प्रक्रिया करून ग्रीन टी तयार केला जातो. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आरोग्य राखण्यास मदत करतात आणि अनेक आजारांपासून (Health Issue) आपले संरक्षण करतात. मात्र, ग्रीन टीचे योग्य सेवन न केल्यास ते हानिकारकही ठरू शकते. अनेकांना सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिण्याची सवय असते, पण असे केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशाच काही तोट्यांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी ग्रीन टी पिण्याव्यतिरिक्त, दिवसातून अनेक वेळा प्यायल्यास भूक देखील कमी होते. रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने पोटात जळजळ होते आणि व्यक्तीला काहीही खावेसे वाटत नाही. एवढेच नाही तर या मुळे अॅसिड तयार होण्यास सुरुवात होते आणि पोटदुखी देखील सुरु होते.

ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या शरीरात लोहाची कमतरता देखील होऊ शकते. खरं तर, ग्रीन टीमध्ये असलेले टॅनिन पदार्थ आणि पोषक घटकांमधून लोह शोषण्यात व्यत्यय आणतात. त्याच्या अतिसेवनामुळे गर्भधारणेमध्ये किंवा बाळाच्या जन्मानंतरही नुकसान होऊ शकते. जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर ते तुमच्या गर्भपाताचे कारण देखील बनू शकते. कॉफीप्रमाणे ग्रीन टीमध्येही कॅफिन असते. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. असे असले तरी जर रिकाम्या पोटी ग्रीन टी सतत पिल्यास कॅफिनमुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या सुरू होते. दिवसाच्या इतर वेळी ग्रीन टी प्यायची असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *