महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । निर्बंधाबाबत नागपूरशी दुजाभाव करण्यात आल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. कारण मुंबई आणि पुण्यात लग्नसोहळ्यासाठी २०० जणांना परवानगी आहे. मात्र, नागपुरात केवळ ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृह, बँक्वेट हॉलचे संचालक आणि केटरर्स चालकांचे गणित बिघडले आहे. तसेच लग्नाशी जुळलेल्या सर्व उद्योगांना वर्षभरात अंदाजे ३०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला.
लग्न सोहळ्यावर अनेक व्यावसायिक अवलंबून असतात. छोट्यापासून ते मोठे व्यावसायिकांचा व्यवसाय या सोहळ्यावर अवलंबून असतो. मात्र, जवळपास दोन वर्षापासून कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने या लग्नसोहळ्याला शासनाने मर्यादा घातल्या आहेत. परिणामी या व्यवसायींकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे पालन कठोर करून हे शुभकार्य सुरु ठेवण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.
लग्न सोहळा हा जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. आयुष्यात लग्न एकदाच हा सोहळा होते. त्यामुळे ते धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान, अलीकडच्या काळात लग्न समारोह हे लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केले जातात. त्याठिकाणी सर्वसोयी एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही म्हणून लॉन्स, मंगल कार्यालयाला प्राधान्य दिले जाते. लॉन्सचा मालक, वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, पुजारी, केटरर्स, पाहुण्याची देखभाल करणारे, हार, पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, संगीत रजनी आणि आर्केस्टा सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त ओढा लॉन्स व मोठ्या ‘बॉंक्वेट’मध्ये वर लग्न करण्यात असते