अखेर 8-9 तासाच्या अथक प्रयत्नानंतर टप्पाटप्प्याने पुणे व पिंपरी चिंचवडमधील वीज पुरवठा पूर्ववत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ फेब्रुवारी । महापारेषण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या 400 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये(Tower line) झाले. बिघाडामुळे आज (दि.9) पहाटे 4:30 च्या सुमारास पाच ठिकाणी ट्रिपींग आले होते. या तांत्रिक बिघाडामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच चाकण, वाघोली, लोणीकंद आदी ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातील 80 टक्के भागात सकाळी 8:30 ते 12 वाजेपर्यंत व ऊर्वरित 20 टक्के भागात दुपारी 3:15 वाजेपर्यंत वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. दरम्यान वीजपुरवठा विस्कळीत (Power outage) झाल्यानंतर महावितरण व महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपात्कालीन नियोजन केले. यामध्ये कोयनेमधील वीजनिर्मिती वाढविण्यात आली व त्याचा महापारेषणच्या जेजूरी 400 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात आला. जेजूरी उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध झाल्यानंतर सकाळी 8:30 पासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणकडून तांत्रिक उपाययोजना करण्यास वेगाने सुरवात झाली. यामध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad ) शहर तसेच ग्रामीण परिसराच्या 80 टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वप्रथम रुग्णालये, पाणीपुरवठा योजना, घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *