Lata Mangeshkar international school: राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ फेब्रुवारी । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने मुंबईत आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे संगीत महाविद्यालय मुंबईतील कलिना कॅम्पससमोर असेल. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असे त्याचे नाव असणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. (State Government decides to set up Bharat Ratna Lata Mangeshkar International School of Music in Mumbai)

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची ३ एकर जागा असून त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. भारतात दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय असावे असे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कलिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला. त्यानंतर लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या १४ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ प्रत्यक्ष उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *