CBSE: दहावी,बारावीच्या परीक्षा ऑफलाईन; तारीख जाहीर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ फेब्रुवारी । गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन होणार यावर वाद चालू आहे. परीक्षा ऑफलाईन न होता ऑनलाईन व्हाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होेते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (Central Board of Secondary Education- CBSE) आता दहावी, बारावी टर्म-2 परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं जाहीर केलं आहे. 26 एप्रिल 2022 पासून दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) टर्म-2 बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *