महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावल्यामुळे पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 77 वर्षीय अमोल पालेकर यांची पत्नी संध्या पालेकर यांनी एका वृत्तवाहिनीला पतीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘अमोल पालेकर यांच्या प्रकृतीबद्दल चिंता करण्याचं आता काही कारण नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ असं त्या म्हणाल्या.
एवढंच नाही तर पालेकर यांच्या पत्नीला अमोल पालेकर यांना रुग्णालयात का दाखल केलं? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, ’10 वर्षांपूर्वी याच आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.’
संध्या पालेकर पुढे म्हणाल्या, ‘अतिधुम्रपान केल्यामुळे त्यांना त्रास झाला होता. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. आता पुन्हा त्यांना त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’
अमोल पालेकर यांत्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते एका बँकेत कामाला होते. बँक ऑफ इंडियात अमोल पालेकर क्लार्क म्हणून काम करायचे.