Onion Market: आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिरावलेले ; आता गावरान कांद्याची चलती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । ऊसानंतर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादनापेक्षा सातत्याने (Onion Rate) दरातील चढ-उतारामुळे कांदा हा चर्चेत राहिलेला आहे. आता साठवणूकीतला आणि खरीप हंगामातील (Onion Arrival) कांद्याची आवक सुरु होती. यंदा सरासरीपेक्षा अधिकची आवक होऊन देखील कांद्याचे दर स्थिर राहिले हे विशेष. अन्यथा रात्रीतून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच. शिवाय आता पुण्यातील (Khed Agricultural Market Committee) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये गावरान कांद्याची आवक वाढत आहे. इतर कांद्यापेक्षा गावरान कांद्याला वेगळेच महत्व आहे. हॉटेल व्यवसायिक या कांद्याचा अधिकचा वापर करतात. शिवाय आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

गावरान कांद्याची लागवड क्षेत्रच मुळात कमी आहे. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये 8 हजार पिशवी म्हणजे 4 हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन प्रतवारी नुसार 1 हजार 500 ते 2 हजार 800 पर्यंतचा दर मिळत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनावर परिणाम झालेला असला तरी सध्या गावरान कांद्याची आवक सुरु झाली आहे. गावरान कांद्याला अधिकची मागणी असते. त्यामुळे भविष्यात चाकण मार्केटमधून कांद्याची आवकही केली जाणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चाकण येथील बाजारपेठेत गावरान कांद्याची आवक सुरु झाली असली तरी सध्या स्थानिकचेच ग्राहक अधिकचे आहेत. त्यामुळे सरासरी 2 हजार 200 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, याच कांद्याची निर्यात सुरु झाली तर दरात वाढ होणार असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत खरीप हंगामातील आवक सुरु होती पण आता गावरान कांद्याची आवक सुरु झाल्याने गावरान कांद्याला अधिकची पसंती दिली जात आहे.

यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे. जानेवारी महिन्यात विक्रमी आवकमुळे दोन वेळेस बाजारातील लिलाव हे बंद ठेवावे लागले होते. सध्याही दिवसाकाठी 60 ते 70 हजार क्विंटल कांद्याची आवक सुरु असून दरही चांगला टिकून आहेत. 2 हजार रुपये क्विटलचा सरासरी दर असल्यामुळे मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामधून कांद्याची आवक सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *