महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १० फेब्रुवारी । भारत हा बहुसंख्याक असलेला विकसनशील देश आहे. येथील अर्थव्यवस्था विकसीत होण्यासाठी येथील प्रतेक बेरोजगारांला त्याच्या पात्रते नुसार काम किंवा उद्योग व्यवसाय मिळाला पाहीजे. जेणेकरुन त्याला व त्याच्यावर अवलंबून असणारयांना जिवण जगण्या पुरते उत्पन्न मिळेल परीणामी देशाचेही उत्पन्न वाढेल. त्यासाठी देशात जास्तीत जास्त नोकऱ्या व लघुउदयोग उपलब्ध निर्माण झाल्या पाहीजेत. उयपदन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्या मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे म्हणून उद्योजकांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमी करून जास्तीत जास्त मानवी शक्तीचा वापर करण्यात आला पाहीजे .त्या साठी सरकारने ठराविक आधुनिक मशिनरी च्या वापरावर बंधन घातली पाहीजेत. जास्तीतजास्त मानवी रोजगार वापरून उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकार ने काही योजना राबवल्या पाहिजेत.
जागतीक स्पर्धे मुळे उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देणारच पण त्याने श्रीमंत च श्रीमंत होत आहेत व गरीब अधीक गरीब होत आहेत .परीणामी आर्थिक विषमतेची गरीब-श्रीमंत अशी दरी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे जेणेकरून भविष्यात देशातील सामाजिक शांतता बिघडू शकते. तसे घडू नये म्हणून सरकारने धोरणात्मक बदल घडवून आणले पाहिजेत. वेळ पडलीतर वैयक्तिक श्रीमंतीवर मर्यादा घातल्या पाहिजेत जेणेकरून उद्योजकांची /श्रीमंतांची संख्या वाढेल. व जास्तीत जास्त रोजगार ही निर्माण होतील. एवढे करूनही अर्थ चक्र फिरत नसेल तर बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचे उपाय केले पाहिजेत व धार्मिकसंस्था (सेवाभावी संस्था सोडून) ज्यां संस्थांना प्रचंड पैसा देणगी रुपात मिळतो अशा संस्था कडून जास्तीत जास्त आयकर वसूल केला पाहिजे अशाप्रकारे सरकारने कठोर निर्णय घेतले पाहिजेत. त्या शिवाय खऱ्या अर्थातने भारतीय अर्थ चक्र फिरणार नाही. कारण देशातील प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न वाढल्याशिवाय मागणी वाढणार नाही. व मागणी शिवाय उत्पादनात वाढ होऊ शकत नाही व त्या शिवाय नफा होणार नाही. भारताचा आर्थिक विकास होण्यासाठी मागणी(Demand) उत्पादन-पुरवठा नफा कर (Tax) आर्थिक विकास (GDP) अशाप्रकारे अर्थचक्र फिरले पाहिजे तरच भारताचा सम प्रमाणात आर्थिक विकास होईल व देशात आर्थिक विषमता ही कमी होईल. पि.के.महाजन जेष्ठ कर सल्लागार.