covid guidelines : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्राच्या नव्या सूचना जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १० फेब्रुवारी । जगभरातील करोना व्हायरसची रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक ( guidelines for international arrivals ) सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना १४ फेब्रुवारीपासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, प्रवाशांना आता RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट अपलोड करण्याशिवाय लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करण्याचा पर्याय असेल. ‘अॅट रिस्क’ असलेल्या देशांची यादी हटवली असून जाहीर केलेल्या इतर देशांवर घातलेल्या मर्यादाही हटवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने ही यादीच हटवली आहे.

याचा अर्थ आता या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना कोविडचे नमुने देऊन अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. सरकारने आता भारतात आल्यावर १४ दिवसांचे सेल्फ मॉनिटरींग करण्याची शिफारस केली आहे. त्याच वेळी बंधनकारक असलेला ७ दिवस होम-क्वारंटाइनचा नियम काढून टाकण्यात आला आहे. निगेटिव्ह RT-PCR अहवाल अपलोड करण्याशिवाय आता जगभरातील देशांकडून परस्पर आधारावर प्रदान केलेल्या कोविड -19 लसीकरणाचे संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करण्याचा पर्याय देखील असेल.

भारतात आल्यावर आठव्या दिवशी RT-PCR चाचणी घेण्याची आणि ती एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करण्याचे आवश्यकताही संपुष्टात आली आहे. भारतात आगमन झाल्यावर २ टक्के आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे रँडम नमुने घेतले जातील. प्रवासी त्यांचे नमुने देऊन विमानतळावर जाऊ शकतात. जगभरातील करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन प्रवासाबाबत नियम करण्यात आले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अनेक देशांमध्ये, केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लसीकरणाशिवाय प्रवेश दिला जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *