जास्वंदीच्या फुलाचे आरोग्यासाठी फायदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ फेब्रुवारी । गणपतीला प्रिय असलेले, अतिशय मोहक दिसणारे जास्वंदीचे फूल अनेक रंगांमध्ये बघायला मिळते. लाल, पांढरा. पिवळा, गुलाबी, अश्या अनेक रंगांमध्ये हे फूल बघावयास मिळते. या फुलाला हिबिस्कस रोजा सिनेन्सीस असे शास्त्रीय नाव आहे. पण हे फूल केवळ दिसायला सुंदर नाही, तर आरोग्यासाठी ही विशेष गुणकारी आहे. या फुलामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. या फुलामध्ये क जीवनसत्व, कॅल्शियम, फायबर, लोह, वासा ही पोषक द्रव्ये मुबलक मात्रेमध्ये असून, अनेक व्याधींच्या औषधोपचारासाठी या फुलाचा उपयोग केला जातो.

जास्वंदीच्या फुलांचा वापर करून बनविलेला काढा आपल्या शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा नियंत्रित ठेवण्यास लाभकारक आहे. यामध्ये असलेली पोषक द्रव्ये हृदयनलिकांमध्ये प्लाकपासून तयार होणारा अवरोध रोखतात. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत मिळते. तसेच जास्वंदीची पाने उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी गुणकारी आहेत. जास्वंदीची पाने पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून त्याचे सेवन केले असता, ह्र्रुद्याची जलद गती संथ होण्यास सहाय्य मिळून शारीरिक थकवा दूर होतो.

जास्वंदीच्या फुलांचा उपयोग शरीरातील रक्ताच्या कमी करिता, म्हणजेच अनिमिया करिता करता येतो. शरीरामध्ये लोहाच्या कमीमुळे अनिमिया होतो. ही कमी दूर करण्यासाठी चाळीस ते पन्नास जास्वंदीच्या कळ्या वाटून घेऊन त्याचा रस काढून घ्यावा. हा रस एका घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावा. रोज सकाळी एक लहान चमचा जास्वंदीचा रस दुधाबरोबर घ्यावा. या रसाच्या सेवनाने लोहाची कमी दूर होऊन शरीरामध्ये स्फूर्ती वाढते. तसेच जास्वंदीच्या पानांचा काढा काही दिवस ओळीने घेतल्यास किडनी स्टोन विरघळण्यास सहाय्य मिळते.

ज्यांना ऋतुमान बदलते तेव्हा किंवा प्रदूषित हवेमुळे श्वसनासंबंधी रोगांचा त्रास होतो, किंवा ज्यांना दमा, थोड्या श्रमांनी धाप लागणे अश्या तक्रारी असतात, त्यांनी जास्वंदीची फुले घालून उकळून तयार केलेला काढा साखर न घालता घ्यावा. जास्वंदीमध्ये असललेल्या क जीवनसत्व, क्षार आणि अँटी ऑक्सिडंट्स मुळे श्वसनाच्या तक्रारी दूर होतात. तसेच या काढ्याच्या सेवनाने कफ आणि घसादुखीही बरी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *