महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ फेब्रुवारी ।
मेष:-
आज मानसिक चंचलता जाणवेल. कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. लहानांशी मैत्री कराल.आर्थिक लाभ होईल.
वृषभ:-
आज स्त्री समूहात अधिक वावराल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. दिवस काहीसा आळसात जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.
मिथुन:-
आज कलेचे योग्य मानधन मिळेल. सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल.
कर्क:-
आज धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. पित्त विकार बळावू शकतात, गैरसमजाला खतपाणी घालू नका. भावंडांना मदत करावी लागेल. खाण्या पिण्याचे पथ्य पाळा.
सिंह:-
आज आर्थिक लाभ होईल.अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील. मुलांची धडाडी वाढेल. पैज जिंकता येईल.उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थितीची समस्या दूर होईल.
कन्या:-
वैवाहिक सौख्यात भर पडेल. जोडीदाराविषयी समाधानी असाल. वाहन विषयक कामे होतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरात काही बदल कराल.आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ:-
क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड करू नका. मानसिक शांतता जपावी. आत्मविश्वास बाळगावा लागेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.
वृश्चिक:-
स्वच्छंदीपणे वागाल. जुगारातून लाभ संभवतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल. स्व मतावर ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार ठेवा.
धनू:-
घराचे सुशोभीकरण काढाल. प्रवासाचा आनंद घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमळपणाने वागाल. मानसिक शांतता लाभेल.
मकर:-
अघळपघळपणे बोलणे टाळा. संयमी विचार करावा. गायन कलेचे कौतुक केले जाईल. हातून एखादे सत्कार्य घडेल. कौटुंबिक खर्चाकडे लक्ष ठेवा.तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल.
कुंभ:-
बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल.
मीन:-
मनाजोगा दिवस घालवाल. लाघवीपणे सर्वांना आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. सौंदर्य वादी नजर बाळगाल.अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील. मुलांची धडाडी वाढेल. पैज जिंकता येईल.