‘व्हॅलेंटाईन डे’साठी गिफ्टने सजला पिंपरी बाजार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ फेब्रुवारी । दरवर्षी काही तरी नवीन गिफ्ट देऊन आपल्या प्रिय व्यक्तीवरील प्रेम द्विगुणित करण्याचा प्रेमीयुगलांचा प्रयत्न असतो.बाजारपेठेतील गिफ्ट हाऊसमध्येदेखील गिफ्टचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. एकापेक्षा एक सरस गिफ्ट बाजारात आली आहेत. या गिफ्टमध्ये यंदा मोठी व्हरायटी दिसून येत आहे.

चॉकलेट विथ टेडीबिअर सेट
चॉकलेट आणि टेडीबिअर हा मुलींचा वीकपॉइंट. याच विचाराने चॉकलेट्स आणि टेडीमध्ये विविध सुरेख प्रकार आले आहेत.व्हॅलेंटाईन डे साठी मुलींना गिफ्ट देण्याचे विविध पर्याय असतात. यामध्ये सर्वात जास्त चलती असते ती विविध रंगाच्या टेडी बेअरची. त्यामुळे यंदा टेडी आणि चॉकलेट यांचा एकत्रित बॉक्स ठेवण्यात आला आहे.टेडीबिअर हा वीक पॉइंट पाहूनच कॉफीमग मध्येही छोटा टेडी देण्यात आला आहे. तर वैविध्यपूर्ण रंग आणि आकारात असलेले आणि प्रेमळ संदेश घेतलेले टेडी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत.

ग्रिटींगला पर्याय हार्ट शेप बलून
ग्रिटींग हा सर्वांत उत्तम पर्याय आहे. मात्र, ग्रिटींग खरेदी करणे आता मोबाईलमुळे कमी झाले आहे. त्यामुळे हार्टशेप बलूनचे काही वेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत.यामध्ये बलूनवरच प्रेमाचा संदेश दिला आहे. वेगवेगळ्या रंगांतील हे बलून तरुणांचे लक्ष वेध घेत आहेत. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून यालाही तरुणाई पसंती देताना दिसत आहेत.

गोल्डन रोज
व्हॅलेंटाईन डे साठी सर्वात महत्त्व असते ते गुलाबाच्या फुलाचे. यादिवशी बाजारपेठेत सर्वत्र लाल रंगाच्या गुलाबांना मोठी मागणी असते; पण आपल्या प्रेमाचे प्रतीक नेहमी टवटवीत दिसावे आणि सदैव आठवणीत असावे यासाठी गोल्डन रोज हा एक पर्याय आला आहे. हे गिफ्ट नक्कीच प्रेमी युगलांसाठी स्पेशल असे असेल

चॉकलेट बॉक्स आणि बुके
चॉकलेट हा सर्वांचाच वीक पॉइंट. व्हॅलेंटाईनसाठी खास लालेलाल अशा सुरेख बॅगमध्ये भरलेले चॉकलेटचे बॉक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.विविधरंगी आणि आकारात असलेले चॉकलेटचे बॉक्स हा गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच, चॉकलेट बुकेदेखील दिसायला आकर्षक असल्याने गिफ्ट म्हणून दिला जातो.

कॉफी मग
कॉफी मगवर आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो प्रिंट करूनही देऊ शकतो; पण व्हॅलेंटाईनसाठी खास कपल कॉफी मग संकल्पना आली आहे.यात रंगांचे वेगळेपण आणि मेसेज यामुळे हे मग सुरेख ऑप्शन आहे. पिलो फोटो फ्रेम हा एक हटके पर्याय आहे. दुकानात प्रवेश केल्यानंतर लालेलाल पिलो आपले लक्ष वेधून घेतात.

हार्ट शेपच्या या पिलो यामध्ये या वेळी टेडीचीही कलाकुसर करण्यात आली आहे. यात यंदा रोटेटींग फोटोफ्रेमची भर पडली आहे. यात हार्ट शेपच्या फ्रेम्स आहेत.यात 4 फोटो लावू शकतो. रोटेटींग अशा या फ्रेमला चांगली मागणी आहे. व्हॅलेंटाईसाठी हे स्पेशल गिफ्ट आहे. त्यात दोघांचे फोटो लावून गिफ्ट देऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *