Airtel Down : एअरटेलची सेवा ; देशभरात ब्रॉडबँडपासून, मोबाईल नेटपर्यंत अनेक सेवा डाऊन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ११ फेब्रुवारी । एअरटेलच्या ग्राहकांना आज सकाळपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एअरटेलच्या ब्रॉडबँडपासून ते मोबाईल नेटपर्यंत अनेक सेवा डाऊन झाल्या आहेत. सोशल मीडियावर एअरटेल युझर्सकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार त्यांना मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये अडचणी येत आहेत. देशभरातील अनेक ग्राहकांकडून याबाबत दावे करण्यात येत आहेत. याबाबत एअरटेल युझर्स ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तक्रारी करत आहेत. तसेच तक्रारींचा ओघ वाढल्याने सोशल मीडियावर अल्पावधीत #AirtelDown हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एअरटेलच्या इंटरनेटमध्ये आज सकाळी ११.३० वाजल्यापासून समस्या येत आहेत. अनेक लोकांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. डाऊनडिटेक्टरने सांगितले की, आऊटेजचा फटका भारताच्या अनेक प्रमुख शहरांना बसला. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता आणि इतर अनेक शहरांचा समावेश आहे.

या अडचणींचा सामना करत असलेल्या शेकडो युझर्सनी ट्विटरच्या माध्यमातून आपली तक्रार समोर ठेवली आहे. काही युझर्सची तक्रार आहे की, ते एअरटेल अॅपचाही वापर करू शकत नाही आहेत. दरम्यान, या आऊटेजनंतर लोक ट्विटरवर मीम्सच्या माध्यमातून कंपनीची खिल्ली उडवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *