राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, न्यायालयाने सुनावली 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ११ फेब्रुवारी । राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीये. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयानं हा निर्णय घेतलाय. कारावासासोबत त्यांना 25 हजारांचा दंडही भरावा लागणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुंबई येथील एका फ्लॅटची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचं सिद्ध झालंय. भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत 2017 साली तक्रार केली होती. त्यावर आता निर्णय आलाय.

मुंबईत बच्चू कडू यांनी ४२ लाख ४६ हजाराचा फ्लॅट खरेदी केला होता, पण २०१४ विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता. बच्चू कडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते, कर्जाची परतफेड करता न आल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता. आपल्यावरील आरोप खोटे असं असल्याचं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी २०१७ मध्ये केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *