महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .11 फेब्रुवारी । शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. त्यांना दोन महिन्यांचा कारावास आणि दंड ठोठावण्यात आला आहे. 2014 च्या एका प्रकरणात ही निर्णय आला आहे.
यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलंय की, 2014 च्या आगोदर आमदारांच्या घरासाठी सोसायटी केली होती. सगळ्या आमदारांना शासनाने या घरांच्या कर्जाची हमी घेतली होती. त्याच घरांवर आपण कर्ज काढलं. कर्जाची रक्कम निवडणूक आयोगाला कळवली होती. पण फक्त घराचा क्रमांक कळवला नव्हता. मात्र, कर्जाचे घर असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली आहे. ती जी काही चूक झाली होती, ती काही जाणीवपूर्वक केली नव्हती. मात्र, तरीही न्यायालयाचा निर्णय चूक असला तरी न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे स्वागत करतो. माझ्याविरोधात सूड भावनेने माझ्यावर तक्रार दाखल करण्यात आली, असं त्यांनी म्हटलंय. आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू, ते आम्हाला न्याय देईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.