![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । लग्नसराईत सोन्याबरोबरच चांदीच्या मागणीतीही वाढ झालीय. गेल्या आठवड्यात त्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होतेय. गेल्या आठवड्यात (7 ते 11 फेब्रुवारी) सोन्याच्या किमतीसह (चांदीचा भावात) वाढ (Gold Silver Price) झाली. 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 640 रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 792 रुपयांची वाढ झाली आहे. ही तेजी असूनही, तरीही आपल्यासाठी सोने खरेदी करण्याची चांगली संधी सिद्ध होऊ शकते. सध्या सोन्याचा भाव 49000 रुपये तर चांदीचा भाव 62000 रुपये आहे. (Check Today’s Gold Silver Price Updates)
गेल्या आठवड्यात (7 ते 11 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 640 रुपयांनी वाढला आहे. या व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी 7 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 48280 रुपये होता. त्याच वेळी, 11 फेब्रुवारी रोजी या व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 48920 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. या व्यापारी आठवड्यात (7 ते 11 फेब्रुवारी) चांदीच्या दरात प्रति किलो 792 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 7 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 61365 रुपये प्रति किलो होता. दुसरीकडे, शुक्रवारी, 11 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 62157 रुपये प्रति किलोवर पोहोचला.
शनिवार आणि रविवारी दर जाहीर होत नाहीत
इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोन्या-चांदीचे दर जाहीर करत नाहीत. शुक्रवारी सोने 19 रुपयांनी महागले आणि 48921 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. याआधी गुरुवारी सोन्याचा भाव 48901 रुपये प्रति 10 ग्रॅमवरबंद झाला होता. तर चांदी 668 रुपयांनी स्वस्त होऊन 62157 रुपये प्रति किलोवर बंद झाली. गुरुवारी चांदीचा भाव 62825 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला.