महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । आयओसीएल (IOCL) ने आजचे लेटेस्ट पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तीन महिन्यांपासून अधिक काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात सलग 101 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या तीन महिन्यांपासून मात्र पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच निवडणुकांनंतर मात्र पुन्हा एकदा देशात पेट्ररोल-डिझेलचा भडका उडणार असल्याचंही बोललं जात आहे
निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार?
कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन युक्रेनवर येत्या आठवड्यात आक्रमण करण्याचे आदेश देतील, असा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत.
देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.