पिंपरी चिंचवडमधून चांगली बातमी, पहिल्या तिन्ही रुग्णांनी ‘कोरोना’ला हरवलं, 6 दिवसांत एकही नव्या कोरोनाबाधितांची नोंद नाही

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; पुणे; पिंपरी चिंचवड, महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या 3 कोरोनाबाधितांची दुसरी कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तिघांनाही आज डिस्चार्ज दिला जाणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित आढळलेल्या पहिल्या 3 रुग्णांना आज हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार आहे. सोमवारी या 3 कोरोनाबाधितांवर उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. आज त्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे.

11 मार्च रोजी दुबईहुन आलेल्या 3 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले होतं. तेव्हापासून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णलयात उपचार सुरू होते. मात्र, इथून पुढचे 14 दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहण्याची सूचना तिघांनाही देण्यात आली आहे. त्याच बरोबर इतर 28 जणांचेही रिपोर्टही निगेटिव्ह आढळून आले आहे. तर मागील 6 दिवसात नवीन कोरोना बाधितांची नोंद नाही. उपचार सुरू असलेल्यांचीही प्रकृती स्थिर, असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *