६२ दिवसांचा लॉकडाउन अखेर उठला; या प्रांताने घेतला मोकळा श्वास

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; बीजिंग, : चीनच्या हुबेई प्रांतातला लॉकडाउन तब्बल दोन महिन्यांनी उठला आणि लोकांनी बस, ट्रेन स्टेशनवर गर्दी केली. आपल्या आप्तजनांपासून सव्वादोन महिने लांब राहिलेल्या आणि घरात कोंडलेल्या नागरिकांना पहिल्यांदाच मोकळीक मिळाली. कोरोना व्हायरस चा प्रसार याच हुबेई प्रांतातून जगभर झाला. या कोरोनाचं एपिसेंटर अर्थात केंद्रबिंदू ठरलेलं वुहान शहर मात्र अजूनही बंद आहे. वुहानचा लॉकडाउन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उठवण्यात येईल.

वुहान ही या हुबेई प्रांताची राजधानी आहे. वुहानमध्ये कोरोनाव्हायरसनं थैमान सुरू झाल्यावर हा संपूर्ण प्रांत लॉकडाउन करण्यात आला होता. कुणालाही विनापरवानगी रस्त्यावर यायला मनाई होती. सध्या महाराष्ट्रात असलेल्या लॉकडाउनपेक्षा हुबेईचं लॉकडाउन अधिक कठोर होतं, असं आता समोर येत असलेल्या काही व्हिडीओंवरून स्पष्ट होईल.

हुबेईला जाणारे सर्व रस्ते, ट्रेन, विमानं पूर्णपणे बंद होतं. अनेक जण या लॉकडाउनमुळे या प्रांतातच अडकले. पण कुणालाही लॉकडाउन सोडून बाहेर पडायची परवानगी नव्हती. आठवड्यातून फक्त एकदा घरातल्या एकाच व्यक्तीला बाहेर जीवनावश्यक वस्तू आणायला जायची परवानगी होती. या कडक बंदच्या अंमलबजावणीमुळेच वुहान आणि हुबेईचा कोरोनाव्हायरचा उद्रेक आटोक्यात आला. सलग 18 दिवस एकही स्थानिक रुग्ण या प्रांतात सापडला नाही. त्यामुळे तब्बल 62 दिवसांनी हुबेई खुलं झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *