महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ फेब्रुवारी । बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटामधील आया ये झुंड (Aaya Ye Jhund Hai) है हे गाणं नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाणं अतुल गोगावले (Atul Gogavale) यांने गायले आहे. अजय (Ajay Gogavale) आणि अतुल या दोघांनी हे गाणं लिहिले असून हे गाण्याला संगीत देखील त्यांनी दिलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केले आहे. चार मार्चला झुंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
गाण्यामध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लाहान मुलं देखील दिसत आहेत. तसेच गाण्यामध्ये अभिनेता आकाश ठोसर देखील दिसत आहे. आकाश या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. सैराट या चित्रपटामुळे आकाशला विशेष लोकप्रियता मिळाली.
झुंड चित्रपटाचे कथानक हे विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित असणार आहे, असं म्हणटलं जात आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल टीम तयार केली होती. याच कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. हा पोस्टर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘ आमची टीम तुम्हाला भेटायला येत आहे. झुंड 4 मार्चला होणार प्रदर्शित’