महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ फेब्रुवारी । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,६३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)