महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ फेब्रुवारी । गेल्या काही काळापासून पुण्यासह महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील विविध कोपऱ्यातून दररोज महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. असं असताना पुण्यातून (Pune) महिला अत्याचाराची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने एका तरुणीला लग्नाचं आमिष (Lure of marriage) दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार (builder raped woman) केला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीनं डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे. भारत देसडला असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. मागील काही काळापासून आरोपी बिल्डरने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहे.
आरोपी भारत देसडला हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. त्याचबरोबर आरोपी देसडला हे अलीकडेच घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्ष देखील होते. देसडला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. आरोपी देसडला हे पुण्यातील प्रसिद्ध रोहन बिल्डर्सचे भागीदार आणि संचालक आहे.
आरोपी बिल्डरने मागील काही काळापासून पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. दरम्यान पीडित तरुणीने लग्नासाठी विचारणा केली असता, आरोपीनं लग्नाला नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढे पोलीस कोणतीही कारवाई करणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.