एकच बाईक पेट्रोल आणि बॅटरीवरही धावणार ; औरंगाबादच्या रँचोचं भन्नाट संशोधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ फेब्रुवारी । सध्या बाजारात मोठ्याप्रमाणात इलेक्ट्रिक मोटारसायकल येत आहेत. पण ही मोटारसायकल खरेदी करत असताना आपल्यासमोर प्रश्न पडतो की, मध्येच जर चार्जिंग संपली अथवा बॅटरीमध्ये काही अडचण निर्माण झाली तर काय करायचं, पण औरंगाबादच्या एका तरुणाने यावर उपाय शोधला आहे. पेट्रोल आणि बॅटरी दोन्हीवर चालणारी मोटारसायकल या तरुणाने बनवली आहे. विशेष म्हणजे फक्त २० हजारात.

औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरात राहणाऱ्या अफरोज शेख नावाच्या तरुणांन भंगारमधून घेतलेल्या दुचाकीच चक्क इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतर केलं आहे. विशेष म्हणजे ही बाईक फक्त चार्जिंगवरच चालत नाही तर बॅटरी संपल्यावर पेट्रोलवर सुद्धा चालते. ही बाईक तयार करण्यासाठी तीन महिने लागले तर एकूण २० हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर तीन तास चार्ज केल्यावर ही बाईक २० किलोमीटर चालते. तर पेट्रोलवर ४५ ते ५० किलोमीटरचं अॅव्हरेज देते.

विशेष म्हणजे आपली चालू गाडी इलेक्ट्रिक करण्यासाठी जास्त मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही. ही टेक्नॉलॉजी वापरून आपण महिंद्रा, बजाज, टीव्हीएस, होंडा, या कोणत्याही प्रकारच्या दुचाकीला सहज इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलू शकतो. तसेच ज्या दुचाक्या पंधरा वर्षानंतर स्क्रॅप होतात,त्यांच्या चेसिस आणि इतर गोष्टी वापरून इलेक्ट्रिक बाईक तयार केली तर ५० टाक्यांपर्यंत किंमत कमी होऊ शकते.

अफरोज एकदा आपल्या आईला घेऊन जात असताना, त्याच्या गाडीतील पेट्रोल अचानक संपले. त्यामुळे त्याला गाडी ढकलून आणावी लागली, तसेच आईला सुद्धा पायी चालावे लागलं. त्यामुळे पेट्रोल संपल्यावर सुद्धा गाडी चालली पाहिजे अशी गाडी आपण तयार करायला पाहिजे अशी कल्पना अफरोजला सुचली. त्यामुळे भंगारातून ३ हजारात घेतलेल्या दुचाकीवर तीन महिने मेहनत करत त्याने अखेर ही बाईक तयार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *