डॉ. अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, कोणत्या वाहिनीवर दिसणार मालिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ फेब्रुवारी । आजपर्यंत डॉ. अमोल कोल्हेंनी (amol kolhe) अनेक ऐतिहासिक मालिकेमध्ये काम केल्याचे पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांच्या मालिकांनी लोकांच्या मनावर देखील राज्य केलं आहे. त्यामुळं त्यांच्या येणा-या नव्या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. कारण त्यांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची (shivaji maharaj) भूमिका साकारली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर (social media) शेअर केली आहे. त्यामुळे त्यांनी ही मालिक कशी असेल, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आत्तापर्यंत अमोल कोल्हे यांनी अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांच्या भूमिका देखील लोकांच्या पसंतीला अधिक उतरल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपट देखील केले आहेत. त्याचबरोबर त्यांची राजकीय कारर्कीद सुध्दा यशस्वी झालेली आपण पाहिली आहे. ते सध्या एका पक्षाचे खासदार आहेत.

https://www.instagram.com/amolrkolhe/?utm_source=ig_embed&ig_rid=4d176a77-50c2-4ede-b15a-c0ae753e1b2f

पोस्टमध्ये काय लिहिलंय

अमोल कोल्हे यांनी काल एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की योग आला पुन्हा ते गारूड अनुभवण्याचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर “महाराज” साकारण्याचा! असं त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचबरोबर स्वराज्य सौदामिनी ताराराणी.. सोमवार ते शनिवार ७.३० वाजता सोनी मराठीवर असंही लिहिलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांना त्यांची नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे. काल ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तर त्यात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, असेही प्रश्न विचारले आहेत. त्यामुळं चाहत्यांना सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरचं पाहायला मिळणार आहे.

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका ताराराणीच्या जीवनावर भाष्य करणारी

डॉ. अमोल कोल्हे अभिनेते आणि राजकीय नेते आहेत. सध्या ते एका पक्षाचे खासदार आहेत. त्यांची स्टारप्रवाहवरील राजा शिव छत्रपती लोकांना अधिक आवडली होती. तसेच त्यांनतर अमोल कोल्हेच्या प्रसिध्दीत अधिक भर पडली असल्याचे पाहायला मिळाले. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका ताराराणीच्या जीवनावर भाष्य करणारी आहे. त्यामुळे ही मालिका देखील लोकांना अधिक आवडेल असं वाटतंय. कारण याच्या आगोदर महाराजांच्या केलेल्या भूमिका अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांना अधिक आवडल्या होत्या, त्यामुळं ही मालिका देखील लोकांना आवडेल. सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *